लखनऊमध्ये ट्रॉमा सेंटरला भीषण आग; 6 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधल्या लखनऊमधील किंग जार्ज चिकित्सा विद्यापीठा (केजीएमयू)च्या ट्रॉमा सेंटरमध्ये काल संध्याकाळी भीषण आग लागली.  त्याच वेळी ट्रॉमा सेंटरमध्ये 400हून अधिक रुग्ण उपचार घेत होते.

एसीत शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. दुस-या मजल्यावर अॅडवान्स ट्रामा लाइफ सपोर्ट(एटीएलएस) वॉर्डमध्ये अचानक लागलेल्या आगीनं काही क्षणांत रौद्ररूप धारण केलं. तिस-या मजल्यापर्यंत पसरल्यानंतर या आगीनं मेडिसिन स्टोरलाही विळख्यात घेतले.

आगीच्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तीन जण गंभीररीत्या जखमी आहेत.

मध्यरात्रीच्या सुमारात आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. आग विझवण्यासाठी मध्यरात्री 10 अग्निशामक दलाच्या गाड्या, 45 अग्निशामक जवान दाखल झाले होते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

*