रोशन कुटुंबाने विकत घेतलेला 30 कोटींचा भूखंड अडकला वादाच्या भोवऱ्यात!

0
बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक राकेश रोशन आणि मुलगा हृतिक रोशन यांनी खंडाळा येथे विकत घेतलेली जमीन वादात सापडण्याची शक्यता आहे.
एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात रोशन कुटुंबाच्या सुंदर भवर हॉलिडे होम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने खंडाळा येथे जमीन विकत घेतली. रोशन यांच्या कंपनीने त्यांच्या मालकीच्या भूखंडाबरोबरच तिथल्या सरकारी जमिनीचा काही भाग बळकावल्याचा आरोप करण्यात येत आहे.
किरण गायकवाड यांनी माहिती अधिकारांतर्गत हे प्रकरण समोर आणले. रोशन यांनी डिसेंबर महिन्यात 30 कोटी रुपयांना हा भूखंड विकत घेतला होता. 181 बी मावळ तालुका हा 504 चौरस मीटरचा भूखंड राज्य सरकारच्या मालकीचा आहे तसेच सर्वे नंबर 182 हा भूखंड दफनभूमीसाठी आरक्षित आहे.
राकेश आणि हृतिक रोशन यांनी यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
या जागेची जबाबदारी असलेल्या शाकीर शेखने सुंदर भवर हॉलिडे होम्सने कोणतेही बेकायदा काम केले नसल्याचे सांगितले. आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संरक्षक भिंत उभारली. असे शाकीर शेखने उपस्थित केला.
कागदपत्रांवरुन समोर आलेल्या माहितीनुसार 19 डिसेंबर 2016 रोजी रोशन यांनी ही जमीन विकत घेतली. यावर्षी नऊ फेब्रुवारीला संरक्षक भिंत बांधायला लोणावळा महापालिकेने मंजुरी दिली. 3 एप्रिल 2017 रोजी एमएसआरडीसीने ना हरकत प्रमाणपत्र दिले. किरण गायकवाड यांनी जी कागदपत्रे समोर आणली आहेत त्याची आम्ही छाननी करु पण यावेळी यापेक्षा जास्त काही बोलता येणार नाही असे लोणावळा महापालिकेचे अधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*