रोल मिळवण्यासाठी अनुपम खेर यांनी मधुर भांडारकरला केले १२ फोन

0

‘इंदु सरकार’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अनुपम यांना हा किस्सा सांगितला. ते म्हणाले की, ‘मधुरने आतापर्यंत १२ सिनेमे बनवले आहेत आणि मी त्याला प्रत्येक सिनेमावेळी म्हणजे १२ वेळा एखाद्या व्यक्तिरेखेसाठी फोन केला आहे.

प्रत्येक सिनेमाच्या चित्रीकरणावेळी मी त्यांना फोन करायचो आणि या सिनेमात घेणार की नाही असं विचारायचो. तुम्हाला खोटं वाटतं असेल तर तुम्ही मधुरलाही ही गोष्ट विचारू शकता.’

‘खास गोष्ट अशी आहे की, या सिनेमांबद्दल मला मधुरचे सहकारी अशोकच सांगायचे. प्रत्येक सिनेमावेळी ते लेखकांना बोलवायचे तेव्हा माझा फोन त्यांना जायचा. मला ज्या दिग्दर्शकासोबत काम करायचे आहे, त्याच्याकडे स्वतःहून जाऊन काम मागायला अजिबात लाज वाटत नाही.’

खेर पुढे म्हणाले की, ‘मधुरने या सिनेमासाठी संपूर्ण तयारी केली होती. आम्ही कलाकारांनी फक्त त्या व्यक्तिरेखा जीवंत करण्याचा आमच्यापरिने प्रयत्न केला.’

हा सिनेमा २८ जुलैला प्रदर्शित होणार आहे. मधुर भांडारकर दिग्दर्शित आगामी ‘इंदु सरकार’ सिनेमात नील नितिन मुकेश संजय गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

LEAVE A REPLY

*