रोबोटिकचे प्रशिक्षण नगरमध्ये मिळणे ही काळाची गरज, डॉ.धनश्री विखे यांचे प्रतिपादन

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित असे, रोबोटिक (यंत्रमानाव)चे प्रशिक्षण नगरमधील विद्यार्थ्यांना मिळणे ही काळाची गरज असून, नगरमध्ये प्रथमच सेंटर उघडून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचे ज्ञान कसे देता येईल, यासाठीही प्रयत्न करण्याची पुढे गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. धनश्री विखे यांनी केले.

नगरच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रोबोटिक प्रशिक्षण देणार्‍या लेगो कार्निवल व अधिकृत एज्युकेशन सेंटरचे उद्घाटन यंत्रमानावाच्या हस्ते उद्घाटक मर्चंट बँकेचे ज्येष्ठ संचालक हस्तीमलजी मुनोत यांना व प्रमुख पाहुण्यांना गुलाबपुष्प देऊन एक आगळावेगळा उपक्रम करण्यात आला.

यंत्रमानव कशा पद्धतीने कार्य करतो याचे एक प्रत्यक्षिकच याप्रसंगी उपस्थितांसमोर करण्यात आले. सर्वांनी त्याचे टाळ्या वाज़वून स्वागत केले. त्यानंतर सेंटरमध्ये फित कापून सर्व मान्यवरांच्या हस्ते अधिकृत शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी धनश्री विखे, विनायक देशमुख, नरेंद्र फिरोदिया, विलास लोढा, मर्चंट बँकेचे संचालक संजय चोपडा, कमलेश भंडारी, प्रेरणा दिघे-बाफना, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निशांत जैन,उत्तमराव करपे,नगरसेवक सुवेंद्र गांधी व सेंटरचे संचालक प्रितेश संकलेचा, हार्दिक शाह आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत करुन लेगो एज्युकेशन व जगविख्यात कंपनीच्या साधनांनी विद्यार्थ्यांसाठी नियो रोबोज ब्रेन बॉक्स या फर्मच्या माध्यमातून प्रि-नर्सरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या वयोमानानुसार वेगवेगळ्या पद्धतीने (स्टिम) सायन्स, टेक्नॉलॉजि, इंजिनिअरींग, व मॅथेमॉटिक्स या माध्यमातून रोबोटीक्सचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे सेंटर असून, या सेंटरला सर्व विद्यार्थी व पालकांनी समक्ष भेट देऊन त्याची माहिती घ्यावी, असे सांगितले.

याप्रसंगी हस्तीमलजी मुनोत यांनी या उपक्रमास भरभरुन शुभेच्छा दिल्या व बँकेच्या माध्यमातून या सेंटरसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.

रोबोटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी निशांत जैन यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व नागरिकांना या रोबोटिक तंत्रज्ञानाविषयी स्लाईड शो द्वारे सविस्तर माहिती दिली.

आ.संग्राम जगताप यांनीही या सेंटरला भेट देऊन या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी इंडस वर्ल्ड स्कूलचे संचालक विनायक देशमुख म्हणाले, सध्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कल्पकता व शोध याला फार महत्व आहे. आज नगरमधील विद्यार्थ्यांसाठी एक चांगले ज्ञानाचे नवे दालन, नवीन कल्पना घेऊन उपलब्ध करण्यात आले आहे. या रोबोटिक मानवाचा भविष्यात शेतीसाठी सुद्धा उपयोग करता येईल. करमणुकीतून चांगल्या तंत्रज्ञानाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार असून, लवकरच इंडस स्कूलमध्येही या रोबोटीक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

याप्रसंगी साई एंजल्स स्कूलचे संचालक उत्तमराव करपे यांनी या नवीन उपक्रमाचे स्वागत केले. निश्‍चितच नगरमधील विद्यार्थ्यांचा व पालकांचा यास चांगला प्रतिसाद मिळेल, असे सांगून साई एंजल्स स्कूलमध्येही या तंत्रज्ञाना अवलंब करण्यात येईल, असे जाहीर केले.

नरेंद्र फिरोदिया यांनी बोलतांना सांगितले की, रोबोटीक सेंटरमधील प्रत्यक्ष प्रतिकृतीची पाहणी केली व निश्‍चितच हे तंत्रज्ञान भविष्यात विद्यार्थ्यांना समजून घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले व निश्‍चितच नगरमधील नागरिक यास भरभरुन प्रतिसाद देतील, अशी त्यांनी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले तर आभार संजय बाफना यांनी मानले.

LEAVE A REPLY

*