रोनाल्डोचा हॅट्ट्रिक; रिअल माद्रिद उपांत्य फेरीत

0
बायर्न म्युनिकवर ४-२ अशा विजयासह रिअल माद्रिद उपांत्य फेरीत

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या वादग्रस्त हॅट्ट्रिकच्या बळावर रिअल माद्रिदने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बायर्न म्युनिकवर ४-२ अशी मात केली.

या विजयासह रिअलने उपांत्य फेरीत वाटचाल केली. रोनाल्डोने चॅम्पियन्स लीग स्पर्धेत गोलशंभरीही गाठली.

या विजयासह रिअलने स्पर्धेत बायर्न म्युनिकविरुद्धची कामगिरी ६-३ अशी सुधारली. रिअल माद्रिदने सलग सातव्या वर्षी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान पटकावले आहे. रिअलचा संघ पिछाडीवर होता, मात्र रोनाल्डोने भरपाई वेळेत केलेल्या गोलच्या बळावर रिअलने बाजी मारली.

LEAVE A REPLY

*