रिधुरवाडा दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयित मुंबई पोलिसांकडून ताब्यात

0
जळगाव  / शानिपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रिधुरवाडा येथे 5 ते 6 दरोडेखोरांनी बंगाली कारागीरांना चाकु-सुर्‍यांचा धाक दाखवून 14 लाखांचे अर्ध्या किलो सोन्याचे दागिने लांबवून नेल्याची घटना 17 जुलै 2015 रोजी घडली होती.
या प्रकरणी शनिपेठ पोलिसात दाखल असलेल्या गुन्हात पोलिसांनी मुंबई येथील तळोजा कारागृहात असलेल्या एका संशयिताला ताब्यात घेवून अटक केली.
या संशयिताला आज न्यायालयात हजर केले असता, दि.12 पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
रिधुरवाडयातील गुरुदेव रामदास महंती वय 35 यांच्या मातोश्री बिल्डिंग मध्ये काम करीत असलेल्या बंगाली कारागीरांना 5 ते 6 दरोडेखोरांनी चाकु-सुर्‍यांचा धाक दाखवून त्यांच्याजवळील 14 लाखांचे दागिने लुटून नेले होते.

याप्रकरणी महंती यांच्या फिर्यादीवरून शानिपेठ पोलिसात गुन्हा दाखल असून गेल्या दोन वर्षापासून या गुन्हातील संशयित फरार असल्याने तपास थंडावला होता.

दरम्यान महंती यांनी याबाबत न्यायालयात धाव देखील घेतली होती. न्यायालयाने तत्कालीन पोलिस अधिक्षकांसह, पोलिस निरीक्षकांना नोटीस दिली होती.

कपाळावर गोटी असलेला संशयित तळोजा कारागृहातून ताब्यात
सीसीटीव्ही फुटेज मध्ये कपाळावर गोटी असलेला संशयित कैद झाला आहे. या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी अशा गुन्हेगारांचा शोध घेतला. दरम्यान मुंबई येथील तळोजा कारागृहात असलेल्या अप्पु अन्थोनी मुत्तु उर्फ गंगाधर अन्थोनी मायकल रा. म्हाडा चाळ कोळीवाडा मुंबई याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर मुंबई येथील नेरुळ व ठाणे येथील वसई पोलिसात दरोडयाचे गुन्हे दाखल आहे.

संशयिताला तीन दिवसांची पोलिस कोठडी
मुंबई येथील तळोजा कारागृहातून ताब्यात घेतलेला संशयित अप्पु अन्थोनी मुत्तु उर्फ गंगाधर अन्थोनी मायकल याला आज न्या. नेमाडे यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्याला दि.12 पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

*