राहाता शहर कडकडीत बंद; व्यापार्‍यांचाही संपाला पाठिंबा

0

राहाता (वार्ताहर)- शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी दिवसभर राहाता शहर व साकुरी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. दुसर्‍या दिवशीही तालुक्यातील सर्व दूध संस्था बंद ठेवण्यात आल्या. तर बाजार समितीत शेतकर्‍यांनी माल न आणल्याने व्यवहार ठप्प होते, व्यापार्‍यांनीही संपाला पाठींबा दिला.

 

 
शेतकरी संपाच्या दुसर्‍या दिवशीही राहाता तालुक्यातील आंदोलनाची धार कायम असून शेतकर्‍यांनी पाठिंबा देण्यासाठी व्यापारीही सरसावले असून त्यांनी या बंदला पाठिंबा दिल्याने राहाता शहर व साकुरी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच तालुक्यातील सर्व दूध संघ व दूध डेअरी आजही बंद ठेवण्यात आल्या. राहाता शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आल्याने सर्व सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. सर्वच गावातील शेतकरी या संपात सहभागी झाल्याचे दिसून येत आहे.

 

 

राहाता बाजार समीतीवर दुसर्‍या दिवशीही शेतकर्‍यांनी कोणताही शेतीमाल न आणल्याने समीती आवारात शुकशुकाट दिसून येत होता. तालुक्यात शेतकरी संपाची व्याप्ती वाढत असून स्वयंस्फुर्तीने नागरिक या संपात सहभागी होत आहेत. जिल्ह्यात मशीनरीची सर्वात मोठी समजली जाणारी बाजारपेठही या संपात सहभागी झाल्याने विविध खरेदीसाठी दुरवरून आलेल्या नागरिकांना परत जावे लागले.

LEAVE A REPLY

*