राष्ट्रवादीचा पदाधिकारीही बनावट ताडी उद्योगात

0

एक्साइची कारवाई , नगरात पुन्हा बनावटचा पेग

अहमदनगर (प्रतिनिधी)- बनावट दारुचे बळी घेणार्‍या पांगरमल घटनेनंतरही प्रशासन सर्तक झालेले नाही. नगरात अजूनही बनावट दारू विक्री सुरू असल्याचे एक्साइच्या कारवाईतून समोर आले. बनावट ताडी विक्री करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारीदेखील या गुन्ह्यात आरोपीच्या पिंजर्‍यात अडकला आहे. पवन भिंगारे असे या पदाधिकार्‍याचे नाव आहे.
पवन रमेश भिंगारे हा राष्ट्रवादीचा शहर उपाध्यक्ष आहे. कोठला परिसरात तो ताडी विक्री करत असल्याची माहिती एक्साइच्या भरारी पथक नंबर एकचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना मिळाली. त्यांच्या पथकाने मंगलगेट व तोफखाना भागात छापे टाकले. या छाप्यात 80 लिटर गावठी दारू व 164 लिटर बनावट ताडी दारू मिळून आली. या दोन्ही छाप्यात 12 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तोफखाना येथील मयुर जयकुमार ढवण असे दुसर्‍या आरोपीचे नाव आहे.

ताडी बनावट आहे की कशी याची खातरजमा करण्याकरीता ती तपासणीसाठी नाशिक येथील न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहे. रिपोर्ट आल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल.
– अनिल पाटील, निरीक्षक, एक्साइज

LEAVE A REPLY

*