राष्ट्रपतिपदाचे दावेदार रामनात कोविंद आज भरणार उमेदवारी अर्ज

0

 

एनडीएकडून राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज अर्ज भरणार आहेत.
यावेळी अमित शाह यांच्यासोबत एनडीएचे काही वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रपती पदासाठी 17 जुलै रोजी मतदान होणार आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुदत 24 जुलै रोजी संपत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोविंद यांच्या उमेदवारीसाठी भाजपने चार सेट तयार केले आहेत.
एका अर्जावर सूचक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह हे आहेत.
दुसऱ्या सेटवर सूचक म्हणून अमित शाह आणि अरुण जेटली हे कोविंद यांचे नाव सुचविणार आहेत.
तिसऱ्या सेटवर सूचक म्हणून अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल आणि व्यंकय्या नायडू हे नाव सुचविणार आहेत.
चौथ्या सेटवर सूचक म्हणून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि सुषमा स्वराज यांचे नाव आहे.

LEAVE A REPLY

*