रामेश्वरकॉलनीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

0
जळगाव । दि.13 । प्रतिनिधी-शहरातील रामेश्वरकॉलनीतील एका पंधरा वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांत एकाला अटक केली आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, रामेश्वर कॉलनीत सकाळी 10 वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी बदामाच्या झाडांची पाने तोडण्यासाठी घराबाहेर पडली होती.

त्या तरुणीचा पाठलाग करुन प्रदीप सांडू सपकाळे या युवकाने तिची छेड काढली. यामुळे त्या मुलीने आरोडा-ओरड केली. नागरीक येत असल्याचे पाहुन प्रदीपने घटनास्थळुन पळ काढला.

पीडीत मुलीने आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीने सांगीतलेल्या वर्णनावरुन प्रदीप सपकाळे याला पोलीसांनी अटक केली आहे.

LEAVE A REPLY

*