राणा डुग्गुबाती आहे एका डोळ्याने अंध, स्वतः केला खुलासा

0
‘बाहुबली’ चा भल्लालदेव राणा डुग्गुबातीने स्वतःबद्दल एक खुलासा केला आहे.
चित्रपटातील एकदम रांगड्या लुकमध्ये असणारा राणाने तो एका डोळ्याने अधू असल्याचे सांगितले आहे. राणाने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
राणाने सांगितले की त्याला दोन डोळे तर आहेत पण तो केवळ एकाच डोळ्याने पाहू शकतो.
राणाने एका तेलुगु मोटिवेशनल चॅटला उपस्थिती लावली होती. जिथे राणाने प्रेक्षकांना म्हटले, “मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगू का? मी केवळ माझ्या डाव्या डोळ्याने पाहू शकतो.
मी लहान असताना एका व्यक्तिने मरणानंतरल त्याचा एक डोळा मला डोनेट केला होता पण त्या डोळ्याने मी कधीच पाहू शकलो नाही.
मी माझा डावा डोळा बंद केला तर मला काहीच दिसत नाही.”

LEAVE A REPLY

*