राज्य सरकार संवेदनाहीन

0

जळगाव ।विरोधकांकडुन संघर्ष यात्रेच्या दुसर्‍या टप्प्याचा समारोप झाला. यात शेतकर्‍यांची कर्जमाफी हा प्रमुख मुद्दा राहीला.

परंतु राज्यातील सरकार निर्णयच काय हालचाल देखिल करीत नसुन अत्यंत संवेदनाहिन सरकार असल्याची टिका राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी केली.
खा. सुप्रिया सुळे या राज्यभर संघटनात्मक आढावा घेण्यासाठी दौरे करीत आहेत. आज त्या जळगाव दौर्‍यावर होत्या. यावेळी त्यांच्या सोबत महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आ. जयदत्त गायकवाड हे देखिल दौर्‍यात सहभागी होते.

खा. सुप्रिया सुळे यांनी सकाळी नुतन मराठा महाविद्यालयात भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर पक्ष कार्यालयात नवनिर्वाचित जिल्हा परीषद सदस्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच प्रत्येक सेल,विभागनिहाय खा. सुळे यांनी आढावा घेतला. त्यानंतर पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परीषदेत दौर्‍याविषयी माहिती देतांना खा. सुळे म्हणाल्या की, संघटनात्मक बांधणीसंदर्भात राज्यभर दौरे केले जात आहे. आज दिवसभरात विविध सेल आणि विभागांचा आढावा घेण्यात आला.

निवडणुकांमध्ये जयपराजय सुरूच असतो. आमचा पराभव झाला असला तरी मतांची टक्केवारी नक्कीच वाढली आहे. संघटना ही महत्वाची असते. संघटनेला कुठल्याही प्रकारचे मापदंड नसतात. काल्पनिक बदल ही पक्षांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. सध्याच्या काळात सामाजिक प्रश्नांवर चर्चाच होत नाही.

संघटनेच्या यशासाठी भविष्यात प्रचार पध्दतीत बदल करावा लागणार आहे. शहरातील बंदीस्त नाट्यगृहाची माहिती घेण्यात आली असुन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमार्फत याठिकाणी एखादा प्रयोग करता येईल का? याविषयी दि. 6 मे रोजी मुंबई येथे होणार्‍या बैठकीत चर्चा होणार असल्याचे खा. सुळे यांनी सांगितले.
कर्जमाफीने दिलासा तर मिळेल
कर्जमाफी हा काही दिर्घमुदतीचा उपाय नाही हे मान्य आहे. पण अल्पमुदतीच्या दृष्टीने कर्जमाफी ही निश्चीतपणे दिलासा मिळणारी आहे. त्यानंतर एक आराखडा आखुन शेतीसंदर्भात नियोजन होणे गरजेचे आहे. केंद्र आणि राज्यातील सरकार केवळ डिजीटलायझेशन, मेक इन इंडीया, स्टार्ट अप इंडीया या सर्वांमध्ये गुंतली असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परीषदेस जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिष पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आ. अरूणभाई गुजराथी, अल्पसंख्यांकचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, महिला जिल्हाध्यक्षा विजया पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील, माजी आ. दिलीप सोनवणे, अरूण पाटील, कल्पना पाटील, कल्पीता पाटील, आदी उपस्थित होते.

संघटनेत ‘ऑल इज वेल’
लोकसभा निवडणुकांपासुन ते जिल्हा परीषदेपर्यंत सर्वच निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा सपाटुन पराभव झाला. असे असतांनाही संघटनेत ‘ऑल इज वेल’ असल्याचा दावा खा. सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.

LEAVE A REPLY

*