राज्य सरकारने मराठा आरक्षणावर भूमिका घ्यावी; मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

0

मराठा आरक्षणाचा मुद्दा मागास प्रवर्ग आयोगाकडे पाठवायचा की नाही? याबाबत 4 मेपर्यंत ठोस भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

यापूर्वीच राज्य सरकारने हा मुद्दा आयोगाकडे पाठवण्यास हरकत नसल्याची भूमिका हायकोर्टात मांडली आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्याच्या मागासप्रवर्ग समीतीकडे सोपवण्यास हरकत नाही, असं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात सादर केलं आहे.

नव्या स्थापन करण्यात आलेल्या मागासवर्गीय आयोगाकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा सोपवावा, अशा अनेक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाल्या आहेत.

या याचिकेवर हायकोर्टाने सरकारला आणि याचिकाकर्त्यांना आपली भूमिका मांडण्यास सांगितलं होतं.

LEAVE A REPLY

*