राज्य बुध्दीबळ संघटनेच्या अध्यक्षपदी आ.डॉ.परीनेय फुके तर सहसचिवपदी शोभराज खोंडेंची वर्णी

0
नंदुरबार । दि.12 । प्रतिनिधी-नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्यातील प्रतिष्ठित व क्रीडा क्षेत्रातील क्रिकेट या संघटनेनंतर राज्यात ज्या लोकप्रिय खेळाकडे पाहिले जाते अश्या बुध्दीबळ खेळाची अर्थात अखिल मराठी राज्य बुध्दीबळ संघटनेची निवडणूक पार पडली.
यात नंदुरबार जिल्ह्यातील बुध्दीबळ प्रशिक्षक व संघटक शोभराज खोंडे यांची सहसचिव म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.
शोभराज खोंडे हे राज्याच्या बुध्दीबळ संघटनेत सर्वात युवा पदाधिकारी म्हण्ाून तसेच राज्य संघटनेवर निवडून आलेले नंदुरबार जिल्ह्याचे पहिले क्रीडा संघटक ठरले आहे.

शोभराज खोंडे हे 2008 साली बुध्दीबळातील जागतिक क्रमवारीत स्थान मिळवून आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करणारे जिल्ह्याचे पहिले खेळाडू ठरले होते.

त्याचबरोबर त्यांनी 2012 साली राष्ट्रीय वरिष्ठ पंचाची तर 2015 साली आंतरराष्ट्रीय पंचाची फिडे आर्बिटरची परीक्षादेखील उतीर्ण केली आहे.

60 व्या व 62 व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचनालयाच्या महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणूनदेखील त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे.

शोभराज खोंडे हे सध्या शासकीय आश्रमशाळा ढोंगसागाळी येथे व्यवसाय क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असून अश्वमेघराज चेस क्लब व नंदुरबार जिल्हा हौशी बुध्दीबळ संघटनेचे सचिव म्हणून काम पाहत आहे.

त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्य संघटनेने शोभराज खोंडे यांची राज्य संघटनेवर निवड करत त्यांच्यावर मध्य महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली.

निवडणुकीत संघटनेच्या अध्यक्षपदी नागपूर येथील विधान परिषेदेचे आ.डॉ.परीनेय फुके तर सचिवपदी सांगली येथील प्रसिध्द उद्योगपती संजय केडगे यांची निवड करण्यात आली.

संघटनेच्या कार्याध्यक्षपदी औरंगाबादचे विजय देशपांडे, उपाध्यक्षपदी मुंबईचे प्रफुल्ल झवेरी तर कोषाध्यक्ष म्हणून पुण्याचे राजेंद्र कोंडे यांच्यासह इतर पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली.

शोभराज खोंडे यांच्या निवडीबद्दल त्यांचे विविध संघटनांतून व विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*