राज्यातील अर्ध्याहून अधिक पीएच.डी बोगस : शिक्षणमंत्री विनोद तावडे

0

‘राज्यातील अध्र्याहून अधिक पीएच.डी प्रबंध हे नक्कल (कॉपी-पेस्ट/बोगस) आहेत,’ असे वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भारती विद्यापीठाच्या ५३ व्या वर्धापनदिन सोहळ्यात केले.

फक्त पगार वाढवण्यासाठी पीएच.डी केली जाते असेही ते म्हणाले.

यावेळी भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम , रयत शिक्षण संस्थेचे डॉ. अनिल पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत तावडे म्हणाले, ‘आपल्या विद्यापीठांमधील अध्र्याहून अधिक पीएच.डी या कॉपी पेस्ट असतात.

फक्त पगार वाढवण्यासाठी किंवा नावामागे डॉ. लावण्यासाठी पीएच.डी केली जाते. पीएच.डीसाठी निवडण्यात आलेल्या बहुतेक विषयांचा पुढे काहीच उपयोग होत नाही.

मोहनदास पै समितीच्या अहवालानुसार आपल्याकडील पीएच.डीपैकी १.३ टक्के प्रबंधांचे संदर्भ (सायटेशन) वापरले जातात.

त्यासाठी आता सर्व संशोधन केंद्रांना पीएच.डीचे प्रबंध ऑनलाइन जाहीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून प्रबंधांची नक्कल करून पदवी मिळवण्याला अटकाव होऊ शकेल.

 

LEAVE A REPLY

*