राजस्थानमध्ये लग्नसमारंभावेळी भिंत कोसळून 25 वऱ्हाड्यांचा मृत्यू

0

राजस्थानच्या भरतपूरमध्ये बुधवारी रात्री एका लग्नसमारंभात सर्वजण जमले असताना चक्रीवादळामुळे घराची भिंत कोसळून 25 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

भरतपूरमध्ये एक विवाह सोहळा सुरु असतानाच जोरदार वादळ आणि पाऊस सुरु झाला.

या वादळापासून बचाव करण्यासाठी वऱ्हाडी मंडळींनी मंगल कार्यालयाच्या भिंतीचा आडोसा घेतला. मात्र त्याचवेळी वादळामुळे तब्बल 80 फूटांची भिंत कोसळली.

या भिंतीखाली दबून 25 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 4 लहान बालकं, 9 महिला आणि 12 पुरुषांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*