राजस्थानचे मंत्री बाबूलाल वर्मा यांच्या कारला भीषण अपघात

0

राजस्थानचे अन्न आणि वितरण मंत्री बाबू लाल वर्मा यांच्या कारला भीषण अपघात झाला असून यामध्ये त्यांचे पिए  जागीच ठार झाले आहेत.

तर वर्मा आणि कार चालक गंभीर जखमी झाले आहेत.

दोघांवरही कोटा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरु असून वर्मा यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळते.

पोलिसांच्या माहितीनुसार, कोटा-बारन महामार्गावर म्हैस आडवी आल्याने वेगाने जाणाऱ्या वर्मा यांच्या कारचालकाचे नियंत्रण बिघडले आणि कार म्हशीला धडक देऊन पलटी झाली.

या भीषण अपघातात वर्मा यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र प्रदास राजेर (वय ४३) यांचा जागीच मृत्यू झाला, ते बनेटा गावचे रहिवासी होते.

वर्मा यांच्यावर कोटा येथील महाराव भीम सिंह रूग्णालयात आयसीयूत उपचार सुरू आहेत

LEAVE A REPLY

*