रस्त्यासाठी महिलांनी केले आंदोलन

0

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- मुकिंदपूर मधील नगर-औरंगाबाद हायवे ते बेग वस्ती या रस्त्याचे बंद पडलेले काम सुरु व्हावे यासाठी या भागातील रहिवाशी महिलांनी सार्वजनिक बांधकाम खाते व मुळा पाटबंधारे उपविभागाच्या कार्यालयात जाऊन आंदोलन केले.

 
कैकाडी समाज युवक संघटनेच्या सचिव सुनिता संजय गायकवाड यांनी गेले दोन महिन्यापासून यासाठी पाठपुरावा केला होता. सदरचा रस्ता आमदार निधीतून डांबरीकरणाच्या हेतूने मंजूर झालेला होता. परंतु सदरचे काम गेले दोन महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे रस्ताही बंद झाला आहे. शुक्रवारी सकाळी सौ. सुनिता गायकवाड व रजनी भारती यांच्यासह महिलांनी या दोनही कार्यालयामध्ये जाऊन धान्याचे पीठ फेकून आंदोलन केले. सार्वजनिक बांधकाम विभागात ए. बी. सोनवणे तर पाटबंधारे कार्यालयात श्री. कनगरे व श्री. साळुंके यांनी निवेदन स्वीकारले.

 

आंदोलनादरम्यान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोन्ही विभागाशी बोलून रस्त्याचे काम त्वरित सुरु करण्यात येईल असे आश्‍वासन दिले. काम सुरु न झाल्यास 10 मे रोजी तोडफोड आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला.

 
आंदोलनात ताराबाई बोलके, आशा पाटोळे, रेखा पेचे, सविता हिवाळे, कृष्णाबाई माकोणे, प्रमिला जाधव, शरीफा शेख, आदी महिला सामील झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

*