रस्त्यावरील वाहनांवर जप्ती

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील गल्ली-बोळात आढळणारी बेवारस व चालणार्‍यांना अडळा निर्माण करणारी वाहने जप्त करण्यात येत आहे.

गेल्या तीन-चार दिवसापासून आरटीओ, पोलिस प्रशासन व महानगरपालिका यांची संयुक्त कारवाई सुरु असल्याची माहिती मनपाचे अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे यांनी दिली. शुक्रवारी सकाळी बारातोटी कारंजा येथे पथकाने रस्त्याच्याबाजुला लावलेल्या दोन ऍटो रिक्षा ताब्यात घेतल्या.

दरम्यान नो पार्किगमध्ये वाहने लावणार्यांची यावेळी चांगलीच धावपळ उडाली.यापुर्वी 25 ते 30 वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.ऐतिहासिक नगर शहरातील अंतर्गत रस्त्यांची रुंदी जैसे थे असताना वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे वाहतुक व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो.यामुळे रुग्णवाहिका, शाळकरी विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांना चालण्यासाठी अडथळा निर्माण होतो. तसेच वाहतूक कोंडी झाल्यावर वाहने बहुतेक वेळ चालू स्थितीत राहत असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होते.अनेक वाहने तर बंद अवस्थेत अडगळीत पडल्यागत रस्त्यांच्या बाजुला लावण्यात आली आहे.संबधितावर कारवाई बडगा उगारण्यात येत आहे.

गेल्या महिन्यात जिल्हाधिकार्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत घेण्यात आलेली संयुक्त मोहिम यापुढे अशीच सुरु राहणार आहे. जप्त करण्यात आलेली वाहनांची आरटीओ कार्यालयाकडून कागदपत्रांची पडताळणी होवून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आरटीओ कार्यालयाने सांगितले.

LEAVE A REPLY

*