रस्तालूट करणारे चौघे जेरबंद

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोपरगाव पोलीस ठाण्याच्या हाद्दीतील वाहनांची चोरी, रस्तालुट, व दरोडे टाकणार्‍या चार आरोपींना पोलिसांनी 70 हजारांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.  कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सोनु चांगदेव गायकवाड, नवनाथ भिमराव वाघमारे, राहुल विलास वाघमारे, विजय भिमराज घोलप (सर्व रा. सावळीविहरी) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. आरोपी हे वाहन चोरी, रस्तालुट करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यापुर्वी या आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलीस या आरोपींच्या मागावार होते. शुक्रवारी (दि.9) रात्री 1 वाजण्याच्या सुमारास कोपरगाव शहरात चोरी करण्याकरीता आरोपी येणार असल्याची येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांना मिळाली होती.

त्यांनी शहरात सापळा लावुन चौघांना अटक केली आहे.

त्यांच्याकडून एम. एच 15 डीव्ही 2910 ही पल्सर तर एम. एच 20 सीएफ 3372 या दोन दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून अन्य साहीत्य जप्त करण्यात आले आहे. आज चौघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*