रशियात अंदाधुंद गोळीबार, चार जणांचा मृत्यू

0

रशियातील मॉस्कोजवळील क्रॅटोव्हो गावात राहणारा झेकॉव्हने शनिवारी त्याच्या राहत्या घरातूनच रस्त्याच्या दिशेने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

या गोळीबाराने परिसरात खळबळ माजली होती.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि झेकॉव्हमध्ये बराच वेळ चकमक सुरु होती.

या माथेफिरुने पोलिसांवर ग्रॅनेडही फेकले होते. चकमकीदरम्यान माथेफिरुने घरालगतच्या जंगलात पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करत त्याला कंठस्नान घातले.

चकमकीदरम्यान तब्बल १४ वेळा स्फोटाचा आवाज आल्याचे स्थानिकांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

LEAVE A REPLY

*