रविवारी भारत विरुद्ध चीन लढत; चायनीज बॉक्सर मैमतअलीशी लढण्यास विजेंदर सिंग सज्ज

0

भारताच्या स्टार बॉक्सर विजेंदर सिंग आणि चीनचा अव्वल बॉक्सर जुल्फिकर मैमतअली यांच्यामध्ये रविवारी मुंबईतील वरळी येथील एनएससीआय स्टेडियममध्ये बॉक्सिंग लढत होणार आहे.

जुल्फिकर विरुद्धची लढत भारत विरुध्द चीन अशीच आहे.

व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण केल्यापासून सलग आठ लढती जिंकलेला भारताच्या स्टार बॉक्सर विजेंदर सिंग रविवारी सलग नववी लढत जिंकण्याच्या निर्धाराने मुंबईत रिंगमध्ये उतरेल.

यावेळी चीनचा अव्वल बॉक्सर जुल्फिकर मैमतअली याला नमविण्याचे कडवे आव्हान विजेंदरपुढे असेल.

विशेष म्हणजे दोन्ही बॉक्सर या लढतीमध्ये आपले वैयक्तिक विजेतेपद पणाला लावणार असल्याने या लढतीची उत्सुकता वाढली आहे. या लढतीआधी दोन्ही खेळाडूंचे वजन तपासण्यात आले. यावेळी विजेंदरने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

या लढतीमध्ये भारताचा माजी आॅलिम्पिक कांस्य पदक विजेता विजेंदर आपले डब्ल्यूबीओ एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट जेतेपद स्वत:कडे ठेवण्यासह जुल्फिकरचे डब्ल्यूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेट जेतेपदही मिळवण्यासाठी उत्सुक आहे.

दरम्यान रविवारी मुंबईत एकूण सात लढती होणार असून यावेळी आॅलिम्पियन अखिल कुमार आणि जितेंदर कुमार व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण करतील.

LEAVE A REPLY

*