रजनीकांतच्या पुढील चित्रपटात हुमा कुरेशी!

0

‘कबाली’च्या यशानंतर रजनीकांतचा ‘2.0’ हा सिनेमा येतो आहे.

रजनीकांत आता आपल्या या नव्या चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे. ‘कबाली’चे दिग्दर्शक पा रंजीथ हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. येत्या २८ तारखेपासून या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल, असे कळतेय. ऐश्वर्या राय, दीपिका पादुकोण, सोनाक्षी सिन्हा, राधिका आपटे यांच्यासोबत रोमान्स केल्यानंतर रजनीकांत या चित्रपटात हुमा कुरेशीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

रजनीकांतसारख्या मेगास्टारसोबत काम करण्यास हुमा उत्सूक आहे. मुंबईत ‘2.0’चे शूटींग सुरु होणार आहे. हुमा  सध्या या चित्रपटाच्या तयारीत गुंतली आहे. रजनीकांतचा जावई धनुष हा ‘2.0’ चित्रपट प्रोड्यूस करणार असल्याचे कळतेय. खरे तर ‘2.0’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर येणार होता. पण काही तांत्रिक कारणामुळे हा चित्रपट आता दिवाळीनंतर रिलीज होणार आहे. या चित्रपटात रजनीकांतसोबत बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारही दिसणार आहे. यात तो खलनायकाची भूमिका साकारताना दिसेल.
सध्या रजनीकांत आपल्या चाहत्यांना भेटतो आहे. तब्बल आठ वर्षांनंतर कालपासून सलग चार दिवस रजनीकांत आपल्या चाहत्यांना भेटणार आहे.

LEAVE A REPLY

*