‘रँबो’च्या हिंदी रिमेकमध्ये टायगर श्रॉफ!

0

सुपरहिट हॉलिवूड चित्रपट ‘रँबो’च्या हिंदी रिमेकसाठी टायगर श्रॉफचे नाव फायनल झाले आहे.

‘रँबो’ या ‘आयकॉनिक’ हॉलिवूडपटात सिल्वस्टर स्टेलॉन होता. आता या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये टायगर स्टेलॉनची जागा घेणार आहे.

दिग्दर्शक सिद्धार्थ  आनंद हा रिमेक घेऊन येणार असल्याचे कळतेय. एम. कॅपिटल वेंचर, ओरिजनल एंटरटेनमेंट, इपेक्ट फिल्म्स आणि सिद्धार्थ आनंद पिक्चर्स यांची निर्मिती असलेला हा चित्रपट एक बिग बजेट चित्रपट असेल. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण या चित्रपटाचा हिरो मात्र ठरला आहे. आधी यातील लीड रोलमये सिद्धार्थ मल्होत्रा व हृतिक रोशन यांच्या नावांवर विचार झाला होता.

‘रँबो’च्या हिंदी रिमेकबद्दल मी कमालीचा उत्सूक आहे. पण मी सिल्वस्टरची जागा घेऊ शकेल, असे मला अजिबात वाटत नाही. मी लहानपणापासून अशाच भूमिकेसाठी स्वत:ला तयार केले आहे. त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे, एवढेच मी म्हणेल, असे टायगर म्हणाला.

येत्या फेबु्रवारीपासून या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे.

२०१९ साली चित्रपट आपल्या भेटीस येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*