युपीतील एक गाव…प्रत्येकाच्याच आधार कार्डवर एकच जन्मतारखेची नोंद!

0

उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्यातील कंजसा गावातील प्रत्येकाची जन्मतारीख १ जानेवारीच आहे.

त्यांच्या आधारकार्डावरील जन्मतारीख १ जानेवारी आहे.

ही ‘कमाल’ आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी केलीय. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेश सरकारने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या जाणून घेण्यासाठी शिक्षकांना त्यांच्या आधार कार्ड क्रमांकाची नोंद घेण्यास सांगितली.

सरकारी आदेशानुसार काही शिक्षक कंजसा गावात पोहोचले. त्यावेळी प्रत्येक मुलाच्या आधार कार्डावरील जन्मतारीख १ जानेवारीच दिसली. एकाच जन्मतारखेचे आधार कार्ड पाहून त्यांनाही धक्काच बसला.

शाळेतील मुलांच्याच नव्हे तर गावातील प्रत्येकाच्याच आधार कार्डवर एकच जन्मतारखेची नोंद होती. आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी ही चूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. आता ही चूक सुधारली जाईल, असे सांगितले जात आहे. पण या चुकीमुळे ग्रामस्थ चिंतेत आहेत.

अनेक सरकारी कामांसाठी आधार कार्ड लागतं. आता या चुकीमुळे आमची कामे कशी होणार, असा प्रश्न त्यांना पडला आहे. ग्रामस्थांच्या आधार कार्डवर चुकीच्या जन्म तारखेची नोंद झाल्याची माहिती मिळाली आहे.

ही चूक लवकरात लवकर दुरुस्त करण्यात येईल. प्रत्येकाला नवीन आधार कार्ड दिले जाईल, असे सरपंच राम दुलारी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*