‘यश भारती’ची ‘योगी’ करणार चौकशी

0
लखनऊ : १९९४ साली मुलायम सिंह यादव यांनी सुरु केलेल्या यूपीमधील सर्वोच्च बहुमान असणाऱ्या यश भारती पुरस्कारांची चौकशी करण्यात येणार असल्याचे भाजपचे नवनिर्वाची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. युपीसंबंधित कला, संस्कृति, साहित्य खेळांसाठी नावलौकिक प्राप्त केले असेल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.

या पुरस्काराचे स्वरूप 11 लाख रुपये शिवाय 50 हजार रुपयांची पेन्शन दिली जाते. हा आतापर्यंत पुरस्कार अमिताभ बच्चन,  हरिवंश राय बच्चन,  अभिषेक बच्चन, जया बच्चन,  ऐश्वर्या राय बच्चन,  शुभा मुद्गल,  रेखा भारद्वाज,  रीता गांगुली, कैलास खेर,  अरुणिमा सिन्हा, नवाज़ुद्दीन सिद्द़ीकी़,  नसीरूद्दीन शाह,  रविंद्र जैन, भुवनेश्वर कुमार यांसारख्या नामवंतांना युपी सरकारने हा पुरस्कार देऊन गौरविले आहे.

मायावती सरकार आल्यानंतर हा पुरस्कार बंद करण्यात आला होता पण 2012 मध्ये अखिलेश यादव सरकार मध्ये आल्यानंतर हे पुरस्कार सुरु करण्यात आले होते.

अखिलेश सरकार ने गरिबांच्या मदतीसाठी हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे जाहीर केले. मात्र विरोधकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते.

एकदा हा पुरस्कार वितरण कार्यक्रमांतील सूत्रसंचालन करणाऱ्या महिलेलाही हा पुरस्कार देण्याचे आश्वासन देण्यात आल्याने हा पुरस्कार वादात सापडला होता.

LEAVE A REPLY

*