मोटारसायकल चोरांना कैदेची शिक्षा

0

16 मोटारसायकली हस्तगत: चौघा आरोपींचा समावेश

अहमदनगर (प्रतिनिधी)– शहरासह जिल्ह्यातून मोटारसायकली चोरणार्‍या टोळीतील चौघांना वेगवेगळ्या सात गुन्ह्यात न्यायालयाने सहा महिने कैद व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपींकडून पोलिसांनी चोरीस गेलेल्या 16 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. सहा महिन्यापूर्वी अटक केलेले चारही आरोपींविरोधातील खटल्याची सुनावणी अंडरट्रायल चालली.
दीपक तात्याराव थोरात, लखन ऊत्तम वाघमारे, भिमा सोपान मिरगे (तिघेही रा. एमआयडीसी, नगर) व नागेश छगण वारे (रा.खोपटी ता शिरूर,बीड) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. एमआयडीसी ोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सात वेगवेगळ्या गुन्ह्यात दोषी ठरवीत प्रत्येकी 6 महीने साधी कैद आणि पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 महीना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्यावतीने वकील जायभाये यांनी काम पाहीले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी विनोद चव्हाण, तत्कालीन प्रभारी राहुलकुमार पवार यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार हवालदार गांगर्डे, शेख हसण, गावडे, ढाकणे, तरटे, दाताळ यांच्या पथकाने मोटारसायकल चोरी करणार्‍या चौघांना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सोळा मोटारसायकली हस्तगत केल्या होत्या.

 

LEAVE A REPLY

*