मैत्रेय ठेवीदारांचा पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या

0

जळगाव / मैत्रेय कंपनीच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतवणूक करणार्‍यांना त्यांच्या ठेवी परत मिळत नसल्याने सुमारे 250 ते 300 महिलांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यामध्येच ठिय्या मांडला.

जळगावातील कार्यालय बंद असल्याने ठेविदार महिलांसह, एजंट यांनी पोलीसांसमोर संताप व्यक्त केला.

मैत्रेय या कंपनीकडून गुंतवणुकीसाठी मैत्रेय प्लॉटस् अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, मैत्रेय सवर्ण सिध्दी आणि मैत्रेय कन्स्ट्रक्शन आणि रिटरल अश्या योजना राबविण्यात आल्यात.

या योजनांमध्ये जिल्ह्यातील हजारो ठेविदारांनी त्यांची पैसे एजंटच्या माध्यमातुन गुंतवणूक केले.

मात्र सप्टेबर 2015 पासुन मैत्रयचे जळगावातील कार्यालय बंद पडले. आणि ठेविदारांसह एजंट यांची पैश्यांसाठी पायपिठ वाढली.

जिल्हापेठ पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या
जिल्ह्यातील सुमारे 250 ते 300 ठेविदार व एजंट हे सकाळी 11 वाजता गांधी उद्यानामध्ये एकत्रत आले.

याठिकाणी चर्चा करुन ठेविदारांनी आपला मोर्चा जिल्हापेठ पोलीस ठाण्यामध्ये वळविला.

पैसे मिळत नाही तोपर्यंत येथून जाणार नाही असा पावित्रा ठेविदारांनी घेतला. शेवटी सपोनि देवरे, सपोनि. राठोड यांच्यासह कर्मचार्‍यांनी ठेविदारांची समजूत घातली. यानंतर वाद मिटला.

न्यायालयाच्या आदेशाने मिळतेय रक्कम
नाशिक येथील सरकारावाडा येथे मैत्रेय प्रकरणी गुन्हा दाखल झाला.

त्यानंतर न्यायालयाने एक कमिटी तयार केली. त्यात उपजिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक, ग्राहक व सरकारपक्षाचे वकिल, कंपनीतर्फे एक व्यक्ती असे एकुण 5 जणांची कमिटी आहे.

ठेवींच्या मुदती तसेच धनादेश न वटणार्‍यांची आधी रक्कम दिली जात आहे. यासाठी ठेविदारांनी आवश्यक ती कागदपत्रांसह मैत्रेयला ऑनलाईन तक्रार द्यावी.

तसेच जिल्हापेठ पोलीसांशी संपर्क साधुन संबंधीत ठेवींच्या पावत्यांच्या झेरॉक्स प्रती आणाव्यात योग्य ते पुरावे गोळा करुन पुढील कारवाई करण्यात येईल. असे सपोनि देवरे यांनी सांगितले.

मैत्रेयच्या अकाऊंटचेही पैसे अडकले
मैत्रेयचे जळगावातील बि.जे.मार्केटमध्ये कार्यालय आहे. याकार्यालयातील अकाऊंट मनिषा जोशी यांचे 2 लाखाची रक्कमेचा विमा काढला आहे.

याच कार्यालयातील कर्मचार्‍यांचे पगारही झाले नसल्याचे बोलले जात आहे.

धनादेशही वटले नाही
मैत्रेयच्या काही ठेविदारांना धनादेश देण्यात आले होते. मात्र हे धनादेश न वटल्यानेही त्यांचा संताप झाला आहे.

LEAVE A REPLY

*