मेडिटेशन-मेडिसीन एकत्र आल्यास समाजनिरोग : कटारिया

0

अहमदनगर(प्रतिनिधी)- येथील साईसूर्य नेत्रसेवा अंतर्गत कार्यरत असलेल्या थर्ड आय क्लीनीकच्या वतीने राजयोगा मेडिटेशनचे 7 दिवशीय कोर्सेस घेतले जातात. त्यांच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हृदयरोगतज्ञ डॉ. वसंत कटारिया उपस्थित होते.
ते म्हणाले की, आज जगात रोगराईचे प्रमाण वाढत असलेले दिसत आहे. हरी-वरी-करीचा जमाना आहे. लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच वेगवेगळे टेशन आहे. त्यामुळे लहान वयातच बायपास सर्जरी करावी लागते. हृदयरोग होण्याचे मुख्य कारण मानसिक प्रदुषण असते. हे मानसिक प्रदुषण पूर्णपणे नाहिसे करण्याचे काम राजयोगा मेडिटेशन करते. इथे डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे जगातले पहिले थर्ड आय क्लिनीक आहे व त्याद्वारे मोफत मेडिटेशनचे कोर्सेस घेतले जातात. मी संचालिका डॉ. सुधा कांकरिया यांचे मनपूूर्वक अभिनंदन करतो. मेडिटेशन व मेडिसीन एकत्र आल्यास निरोगी समाजाची निर्मिती होईल असा विश्‍वास वाटतो.
राजयोगिनी ब्रम्हाकुमारी आशा दिदी म्हणाल्या की, डॉ. सुधाताई एक आदर्श उदाहरण आहेत. त्यांच्या बिझी जीवनातही त्या मेडिटेशनसाठी वेळ काढतात. स्वतः मेडिटेशन करतात व दुसर्‍यांनाही शिकवतात. त्यामुळे शेकडो व्यक्तींनी इथे मेडिटेशन कोर्सचा लाभ घेतला आहे. घेत आहेत. मी त्यांचे अभिनंदन करते.
मान्यवरांच्या हस्ते कोर्स पूर्ण केलेल्या व्यक्तींना सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. त्यात लहान, तरुण, वृद्ध, स्त्री, पुरु, सर्वांचाच समावेश होता. कोर्स पुर्ण झाल्यावर मुंबई येथे जज्ज् म्हणू पदभार स्वीकारलेल्या श्रुती रामदिन यांनी मनोगत व्यक्त करताना मेडिटेशनमुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनात झालेल्या फायद्यांचा उल्लेख करीत सर्वांनी हा राजयोगा मेडिटेशन कोर्स करावा असा सल्ला दिला. त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातील इतर सदस्यही या कोर्समध्ये सहभागी झाले होते. डॉ. प्रकाश कांकरिया यांनी आभार मानले. राजयोगा मेडिटेशनची पुढची बॅच दि. 8 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट रोजी सकाळी 6.30 ते 8 यावेलेत साई सूर्य नेत्रसेवा येथे संपन्न होईल. सदर कोर्स मोफत असून नांवनोंदणी व फॉर्मसाठी प्रिया दिदी 9850887838 यांच्याशी दि. 6 ऑगस्टपूर्वी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*