मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्रातर्फे पैठण येथे महामस्तकाभिषेक महोत्सव

0
जळगाव । दि.12। प्रतिनिधी-पैठण येथील विश्वस्त मंडळ व श्री 1008 मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्रातर्फे प्रज्ञायोगी दिगंबर जैनाचार्य गुप्तीनंदीजी गुरूदेव ससंघ यांच्या सानिध्यात 17 जून ते 23 जून या कालावधीत मुनिसुव्रतनाथ भगवान यांच्या संगीतमय कथा व 24 जून रोजी शनिग्रह अरिष्ट निवारक श्री 1008 मुनिसुव्रनाथ भगवानजी यांचा महामस्तकाभिषेक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 17 जून ते 23 जून या कालावधीत रोज सकाळी 7.15 ते 9 या वेळेत पैठण येथील विमलसागर हॉल जैन मंदिर येथे संगीत कथा होईल. दि. 24 रोजी सकाळी आठ वाजता भगवान मुनिसुव्रतनाथ विधान व गुरूदेव यांची आहारचर्चा, प्रवचन, बोल्या, सकाळी अकरा वाजता महामस्तकाभिषेक होईल.

यावेळी झुंबरलाल काला मोफत नेत्रालयाचे लोकार्पण होईल. तसेच जीवन अशोककुमार चुडीवाल व सर्व चुडीवाल परिवारातर्फे वात्सल्य भोजनालयाचे लोकार्पण होईल तरी भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे विश्वस्त मंडळ व दिगंबर जैन समाज पैठण यांच्यातर्फे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*