मुख्यमंत्री ‘कॉपी कॅट’ तर शिवसेना ‘गोंधळी’ – खा. सुळे

1
नाशिक : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कॉपी कॅट आहेत. ते प्रत्येक गोष्टीत पंतप्रधान मोदींची कॉपी करतात. ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा त्यातलाच प्रकार आहे. राज्यात अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची हे वाट पाहताय कुणास ठाऊक असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून उत्तर महाराष्ट्रात जिल्हावार  आढावा बैठका घेण्यात येत आहेत. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्या पत्रकारांशी संवाद साधत होत्या.

पुढे त्या म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांचे शहर क्राईम हब होतेच शिवाय नागपूर सारख्या सुसंस्कृत शहरात आता आमदार निवासस्थानात देखील बलात्कार व्हायला लागलेत हे दुर्दैवी आहेत असेदेखील खा. सुळे म्हणाल्या. या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे.

खा. सुळे यांनी शिवसेनेवरही निशाना साधला राज्यातील सर्वात गोंधळी पक्ष असून ते सत्तेसाठी सत्तेत आणि विरोधासाठी विरोधात असतात त्यामुळे नेमके ते कुठे आहेत तेच कळत नाही असे म्हणत खा. सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेवर टीका केली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

*