मुंबई 1993 साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : अबू सालेम दोषी, टाडा कोर्टाचा निकाल

0
1993 च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी टाडा कोर्टात आज सालेमसहित 7 जणांवर निकाल सुनावण्यात येणार आहे.
1993 साली झालेल्या या बॉम्बस्फोटांमध्ये 257 जणांचा मृत्यू झाला होता.
713 जण या स्फोटामध्ये गंभीर जखमी झाले होते तर 27 कोटीचे संपत्तीचे नुकसान झाले होते.
या खटल्याच्या सुनावणीचा हा दुसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यात 2007 मध्ये टाडा कोर्टाने याकूब मेमन आणि बॉलिवुड अभिनेता संजय दत्तसमवेत 100 जणांना दोषी ठरवले होते तर 27 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

LIVE UPDATE

  • 1993 मुंबई बॉम्बस्फोट- कट रचणे, हत्याप्रकरणी मुस्तफा डोसा टाडा कायद्याप्रमाणे दोषी
  • आरोपी फिरोज खान आणि ताहीर मर्चंट कट रचणे, हत्या आणि टाडा कलमांअंतर्गत दोषी
  • अबू सालेम दोषी
  • करीमुल्ला शेख दोषी, टाडा कोर्टाचा निकाल
अबू सालेम या बॉम्बस्फोटांसाठी हत्यारे आणल्याचा आणि वाटल्याचा आरोप आहे.
मुस्तफा डोसा याच्या मुंबईत हत्यारे पोहचविल्याचा आरोप आहे. याशिवाय डोसावर काही जणांना पाकिस्तानात ट्रेनिगसाठी पाठविल्याचा आणि कट रचल्याचा आरोप आहे.
ताहिर मर्चेंट याच्यावर काही जणांना पाकिस्तानात पाठविण्याची व्यवस्था केल्याचा आरोप आहे.
अब्दुल कयूम याच्या अभिनेता संजय दत्त याच्यापर्यंत हत्यारे पोहचवल्याचा आरोप आहे.
रियाज सिद्दीकी याच्यावर स्फोटके आणण्यासाठी अबू सालेमला आपली कार दिल्याचा आरोप आहे.
फिरोज खान याच्यावर दुबईत यासाठी झालेल्या बैठकीत सामील झाल्याचा, हत्यारे आणि स्फोटके आणण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे.
करीमउल्ला शेख याच्यावर आपल्या मित्राला दहशतवादी ट्रेनिग दिल्याचा, हत्यारे आणि स्फोटके आणण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे.
सात जणांच्या फैसल्यास एवढा उशीर का?
– आज सात जणांवर फैसला येणार आहे. या सगळ्याची सुनावणी आता करण्यात येत आहे कारण या सर्वांना मुख्य सुनावणी झाल्यानंतर अटक करण्यात आली होती.
– या प्रकरणातील 27 आरोपी अद्याप फरार आहेत.
कधी आणि कुठे झाले होते बॉम्बस्फोट
पहिला बॉम्बस्फोट- दुपारी 1.30 वाजता, मुंबई स्टॉक एक्सचेंज
दूसरा बॉम्बस्फोट- दुपारी 2.15 वाजता, नरसी नाथ स्ट्रीट
तिसरा बॉम्बस्फोट- दुपारी 2.30 वाजता, शिवसेना भवन, दादर
चौथा बॉम्बस्फोट- दुपारी 2.33 वाजता, एयर इंडिया बिल्डिंग
पाचवा बॉम्बस्फोट- दुपारी 2.45 वाजता, सेन्चुरी बाजार
सहावा बॉम्बस्फोट-दुपारी 2.45 वाजता, माहिम
सातवा बॉम्बस्फोट- दुपारी 3.05 वाजता, झवेरी बाजार
आठवा बॉम्बस्फोट- दुपारी 3.10 वाजता, सी रॉक हॉटेल
नववा बॉम्बस्फोट- दुपारी 3.13 वाजता, प्लाझा चित्रपटगृह
दहावा बॉम्बस्फोट- दुपारी 3.20 वाजता, जुहू सेंटर हॉटेल
अकरावा बॉम्बस्फोट- दुपारी 3.30 वाजता, सहार विमानतळ
बारांवा बॉम्बस्फोट- दुपारी 3.40 वाजता, एयरपोर्ट सेंटर हॉटेल

LEAVE A REPLY

*