मुंबई उच्च न्यायालयात आज कामकाज

0
जळगाव / हुडको कर्जाच्या परतफेडीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने बैठक घेण्याची सुचना दिली होती. मात्र शासनाने त्याबाबतचा अहवाल न दिल्याने मुंबई उच्च न्यायालयात उद्या दि.9 रोजी पुन्हा कामकाज होणार आहे.
घरकुलसह विविध योजनांसाठी तत्कालीन जळगाव नगरपालिकेने हुडकोकडून कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते थकल्याने हुडकोने डीआरटीत धाव घेतली होती.
डीआरटीने 341 कोटीची डिक्री नोटीस बजावून तब्बल 50 दिवस मनपाचे सर्व बँक खाते सील केले होते. त्यानंतर मनपाने मुंबई उच्च न्यायालयात स्थगितीसाठी याचिका दाखल केल्यानंतर डिक्री नोटीसला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देवून दरमहा 3 कोटी हप्ता अदा करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, दरमहा अदा करण्यात येणारी रक्कम पूर्ण झाली असून हप्ता भरण्यास स्थगिती द्यावी, यासाठी मनपाने याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात न्या.गवई, न्या.छगला यांच्या न्यायपीठासमोर कामकाज झाले. न्यायालयाने शनिवारी घेण्यात येणार्‍या बैठकीबाबत अहवाल सादर करावा, अशी सुचना शासनाला दिली होती.

मात्र शासनाने बैठकीबाबत अहवाल न दिल्याने पुन्हा उद्या दि.9 रोजी कामकाज होणार आहे. सुनावणीला हजर राहण्यासाठी मनपा आयुक्त जीवन सोनवणे हे तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत.

मनपातर्फे अ‍ॅड.नितीन ठक्कर तर हुडकोतर्फे अ‍ॅड.व्ही.जी.कुमार काम पाहत आहेत.

 

LEAVE A REPLY

*