मुंबईत प्रेयसीचा प्रियकरावर अॅसिड हल्ला

0

मुंबईच्या गोरेगाव परिसरात तरूणीनं तरूणावर अॅसिड हल्ला केल्याची खळबळजन घटना उघडकीस आली आहे.

ओमसिंग सोळंकी असं जखमी झालेल्या तरूणाचं नाव असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ओमसिंग सोळंकी याचे 25 वर्षीय महिलेशी प्रेमसंबंध होते.

पण मागील काही दिवसांपासून या दोघांमध्ये दुरावा आला होता. ओमसिंग हा बरेच दिवस आपल्या प्रेयसीशी बोलतही नव्हता. तसंच तिला भेटतही नव्हता. याच रागातून प्रेयसीनं ओमसिंगवर अॅसिड हल्ला केला.

 

LEAVE A REPLY

*