मुंबईतील CST रेल्वे स्थानकाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ तर ‘एल्फिन्स्टन रोड’ चे ‘प्रभादेवी’,

0

मुंबईतील ‘एल्फिन्स्टन रोड’ रेल्वे स्थानकाचे नाव ‘प्रभादेवी’, तर ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ रेल्वे स्थानकाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असे करण्यास केंद्रीय गृहविभागाने मान्यता दिल्याचे कळविले आहे.

राज्य शासनाने या दोन्ही स्थानकांची सुधारित नावे इंग्रजी व देवनागरी लिपीत राजपत्रात प्रसिद्ध करून त्याप्रमाणे नावांमध्ये बदल करावेत, असे केंद्रीय गृहविभागाने कळविले आहे.

त्यामुळे गेली अनेक वर्षांपासून यासाठी आपण करीत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.

या दोन्ही स्थानकांच्या नावामध्ये बदल व्हावेत, ही समस्त मुंबईकरांची तसेच राज्यातील जनतेची भावना होती.

LEAVE A REPLY

*