मुंबईच्या स्फोटक तज्ञांकडून कसून तपासणी

0

जळगाव / शामाफायर फटाकाफॅक्टरीमध्ये स्फोट होवून दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

या स्फोटाबाबत मुंबईच्या स्फोटक तज्ञांकडून कसून तपासणी करण्यात आली. यासाठी दिवसभर पथक शामाफायर इंडस्ट्रीजमध्ये तळ ठोकुन होते.

शिरसोली जवळ असलेल्या शामाफायर वर्क्स या फटाका फॅक्टरीमध्ये स्फोट झाल्याची घटना मंगळवारी घडली.

यात राजेंद्र तायडे व हेमंत जयस्वाल हा कामगाराचा मृत्यू झाल. या स्फोटामुळे फॅक्टरीतील सुरक्षितेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान एमआयडीसी पोलीसांनी घटनेची चौकशी सुरु केली आहे. तपासधिकारी सपोनि राहुल खंडागळे यांच्यासह पथकाने अनेकांचे जाबजबाब घेतले.

दिवसभर कामावर असलेल्या कर्मचार्‍यांचे वेगवेगळ्या माध्यमातुन जबाब घेण्यात आले.

मुंबईच्या एक्सप्लोसिव्ह पथकाने घेतले संशयास्पद नमुने
बुधवारी दिवसभर मुंबईचे एक्सप्लोसिव्ह विभागातील कंट्रोलर श्री.सिनीराज, एस.रायचौधरी ह्या दोघांनी शामाफायर येथे येवून स्फोटातील काही नमुने घेतले.

यामध्ये स्फोट होण्यासाठी लागणारे पोटॅशिअमसह अन्य चार पावडरचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच माती मिश्रीत स्फोटक पदार्थही त्यांनी घेतले आहे.

काराखान्यातील प्रत्येक स्फोटक मिक्सींग खोलीतुन त्यांनी नमुने घेतले. सकाळी 10 वाजेपासुन ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत मुंबईच्या स्फोटक विभागाच्या तज्ञांकडून कसून तपासणी सुरु होती.

नाशिक फॉरनसिक सायन्स लॅबकडून तपासणी
नाशिक येथील गृह विभागाची फॉरनसिक सायन्स लॅबची व्हॅन एम. एच. 02 टी.9799 जळगावात दाखल झाली.

यामध्ये वैज्ञानिक साहाय्यक ए.व्ही.गाडगे, सहाय्यक वैज्ञानिक प्रमोद पवार यांच्यासह चालक व दोन अधिकारी दुपारी 2.30 वाजेपासुन शामाफायर फटाके कंपनीत दाखल झाले.

त्यांनीही उशिरापर्यंत चौकशी करुन स्फोट झालेल्या रुमजवळील काही नमुने संकलीत केले.

कंपनीतील सुरक्षितेचाही घेतला आढावा
नाशिक व मुंबई येथील पथकाने फटाका फॅक्टरीतील सुरक्षितेच्या दृष्टिने असलेल्या उपाय योजनांची देखील काटेकोरपणे माहिती घेतली.

सुरक्षितेच्या दृष्टीने त्यांनी कंपनी चालकांना तोंडी सुचनाही दिल्याचे सांगण्यात येत आहे.

तहसिलदार यांच्याकडूनही होणार पंचनामा
शामा फायर फटाका फॅक्टरीचा तहसिलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*