मिसबाह उल हकच्या नावावर अनोखा विक्रम!

0

वेस्ट इंडिज दौऱ्यातल्या लागोपाठ दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हकचे शतक अवघ्या एका धावेने हुकले.

त्यामुळे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक तीनवेळा एका धावेने शतक हुकणारा फलंदाज हा अनोखा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला.

2011 साली पाकिस्तानच्या न्यूझीलंड दौऱ्यातल्या वेलिंग्टन कसोटीत मिसबाह पहिल्यांदा 99 धावांवर बाद झाला.

वेलिंग्टन कसोटीच्या पहिल्या डावात त्याला ख्रिस मार्टिनने 99 धावांवर पायचीत केलं होतं.

त्यानंतर आता विंडीज दौऱ्यातल्या जमैकाच्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानच्या कर्णधारावर पहिल्या डावात 99 धावांवर नाबाद राहण्याची वेळ आली होती.

आता बार्बाडोसच्या दुसऱ्या कसोटीत विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने मिसबाहचा नेमका 99 धावांवर काटा काढला. मिसबाहच्या ग्लोव्हजला चाटून उडालेला चेंडू दुसऱ्या स्लीपमध्ये शाय होपने झेलला.

LEAVE A REPLY

*