मालवणचे लिओ वराडकर आयर्लंडच्या पंतप्रधानपदाचे दावेदार

0

आयर्लंडच्या भावी पंतप्रधानाच्या विजयासाठी गाऱ्हाणं मांडलं जात आहे. तेही मालवणी भाषेत आणि आयर्लंडच्या भावी पंतप्रधानांचं मूळ गाव असलेल्या सिंधुदुर्गात.

लिओ वराडकर. आयर्लंड देशाच्या पंतप्रधानपदाचे दावेदार. मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वराड गावचे. अशोक वराडकर आणि पत्नी मरियम यांचं तिसरं अपत्य.

लिओ सध्या आयर्लंडचे सामाजिक संरक्षण मंत्री आहेत. डबलीनच्या ट्रिनिटी महाविद्यालयातून 2003 साली त्यांनी वैद्यकीय पदवी मिळवली. त्यानंतर फाइन गेल या ख्रिश्चन डेमोक्रेटिक पॉलिटिकल पार्टीतर्फे ते राजकारणात आले.

विशेष म्हणजे लिओ हे मंत्रीमंडळातले पहिले गे सदस्य आहेत.

LEAVE A REPLY

*