माध्यमिक शिक्षकांचे ऑनलाईन समायोजन

0

अतिरिक्त शिक्षकांची यादी सादर करण्याचे आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)– जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असणार्‍या शिक्षकांचे ऑनलाईन समायोजन करण्यात येणार आहे. शाळानिहाय अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांचे जिल्हास्तरावर यादी तयार करून ऑनलाईन समायोजन होणार आहे. यासाठी संबंधीत शाळेत, त्यानंतर संबंधीत संस्थेत अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांची यादी माध्यमिक शिक्षण विभागाने तातडीने मागवली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांनी दिली.
गेल्यावर्षीपासून माध्यमिक शिक्षकांचे ऑनलाईन समायोजन करण्यात येत आहे. यंदाही तिच पध्दत अवंलबण्यात येणार आहे. यासाठी शाळांनी त्यांच्याकडे कार्यरत शिक्षकांची पदे, रिक्त असणारी शिक्षकांची पदे आणि अतिरिक्त शिक्षक होत असल्यास त्याची तपशीलवार माहिती माध्यमिक शिक्षण विभागाने मागवली आहे.ासाठी संबंधीत शाळांनी आणि संस्थेने त्यांच्याकडील शिक्षकांची सेवाज्येष्ठतेसह अनुशेष आणि विषय शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाला द्यावी लागणार आहे.
ज्या शाळेत शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. त्या शिक्षकांचे संबंधीत संस्थेत समायोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर संस्थेत अतिरिक्त होणार्‍या शिक्षकांचे समायोजन दुसर्‍या संस्थेत करण्यात येणार असल्याचे पोले यांनी सांगितले. यासाठी शाळांनी त्यांची माहिती पोर्टलवर भरून ती यू लॉगिंगवर पाठवण्याच्या सुचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*