‘मातृदिनी हुंडाबंदी’ची शपथ

0

राजूर ( वार्ताहर) – महिलांनी मुलीला हुंडा देणार नाही व मुलाचा हुंडा घेणार नाही अशी सामुदायिक शपथ घेऊन तिळवण तेली समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे. मातृ दिनाचे औचित्य साधून अकोले तालुक्यातील महिला तिळवण तेली समाजाच्या झालेल्या बैठकीत हि शपथ घेण्यात आली. जिल्हा तैलिक महासभेच्या अध्यक्षा विधाताई करपे यांनी यावेळी शपथ दिली.

अकोले तालुका महिला तैलिक समाजाची जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारिणीची बैठक जिल्हाध्यक्ष विधाताई करपे यांच्या अध्यक्षतेखाली श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विधालय च्या समर्थ हॉल राजूर येथे झाली. यावेळी संगमनेर तालुका अध्यक्ष श्रीमती कांतिका वाकचौरे, सचिव शारदा करपे, संगमनेर शहर अध्यक्ष रुपाली वालझाडे, श्रीराम पन्हाळे, रवींद्र करपे, प्राचार्या मंजुषा काळे, विलास पाबळकर, दत्तात्रय व्यवहारे, किरण पाबळकर, अकोले तालुका अध्यक्ष देविदास शेलार, जिल्हा उपाध्यक्ष शांताराम काळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*