महापालिकेत आयुक्तांच्या दालनात ठिय्या

0

रस्ता कामासाठी मुकुंदनगरकरांचे आंदोलन  

आयुक्तांचे पुन्हा आश्‍वासन

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर, प्रभाग क्र.10 येथील टॉपअप पेट्रोल पंम्प ते राजनगर या नगरोत्थान योजनेतील रखडलेल्या रस्त्याचे काम आश्‍वासन देवूनही चालू न केल्याच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांनी मनपा आयुक्त दिलीप गावडे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. दिलेल्या आश्‍वासनाची पुर्तता होत नसल्याने नागरिकांनी आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले. सदर रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्याचे आश्‍वासन पुन्हा आयुक्तांनी दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु झाला असून, रस्त्यावर गटारसाठी खड्डे खोदल्याने मैलमिश्रित व पावसाचे पाणी साचले आहे. अनेक महिन्यापासून काम बंद अवस्थेत असताना, मनपा प्रशासनाने आठ दिवसात सदर रस्त्याचे काम सुरु करण्याचे आश्‍वासन दिले होते. तरी अनेक दिवस उलटून देखील रस्त्याचे काम सुरु न झाल्याने संतप्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले.
या रस्त्याच्या साईड गटारसाठी खड्डे खोदल्याने पाण्याची लाईन अनेक ठिकाणी फुटली आहे. यामुळे पिण्याचे व ड्रेनेजचे पाणी एकत्र होवून नागरिकांना नळाद्वारे दुषीत पाणी येत आहे. साईड गटारसाठी खोदलेल्या खड्डयात अनेक ठिकाणी चेंबरचे घाण पाणी साचून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिक नमाज पठणसाठी पहाटे व सायंकाळी मस्जिद मध्ये जात असतात. मात्र रस्त्यावर पथदिवे नसल्याने अंधारात पावसाळ्यात चिखलाने माखलेल्या या रस्त्यावर अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. खोदलेल्या खड्डयामध्ये पाऊसाचे पाणी साचून, साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्याने रस्ता, ड्रेनेज लाईन व स्ट्रिटलाईट चे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनात नगरसेवक फैय्याज शेख केबलवाला, नज्जू पैलवान, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, सलिम शेख भंगारवाले, उबेद शेख, राजू शेख, वहाब सय्यद, समीर खान, रेशमा आठरे, वसिम पठाण, तौसिफ शेख, डॉ.मांडे, देशमुख, अकिस शेख, गौरव ढाकणे आदिंसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*