महापालिका आयुक्त मंगळेंचे अमंगळ स्वागत

0

अहमदनगर (प्रतिनिधी)– नवनियुक्त आयुक्त घनशाम मंगळे यांनी आज महापालिकेत पद्भार स्वीकारल्यानंतर काही वेळातच बोल्हेगावच्या गांधीनगरमधील नागरिकांनी त्यांच्या दालनात आंदोलन सुरू केले. मंगळे यांचे स्वागतच नगरमध्ये अमंगळ पध्दतीने झाले.
भारिप बहुजन महासंघाने या आंदोलनाचे नेतृत्व केले. गांधीनगरच्या चोभे कॉलनीत जाण्यासाठी असलेला पाचशे मीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. 160 कुटुंब असलेल्या या वसाहतीमधील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले. कॉलनीत रस्ते नाहीत, ड्रेनेज, पथदिवे नाहीत. कचरा संकलनासाठी महापालिकेची घंटागाडी कधी येत नाही. रिव्हिजनसाठी अर्ज दाखल करून सहा महिने झाले तरी नोंदणी नाही. त्यामुळे घरपट्टी भरता येत नाही. आम्ही महापालिका हद्दीत आहे की नाही? असा थेट प्रतिप्रश्‍न मंगळे यांना आंदोलकांनी केला. सुनील शिंदे, चांगदेव कांबळे, दिलीप साळवे, सुरेखा पवार, भाऊसाहेब कोहकडे, रेखा धाडगे, बाळू कसबे, शोभा पालवे यांच्यासह नागरिकांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या मांडला. नेहमीप्रमाणे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन संपले.
दरम्यान महापालिका कर्मचारी संघटनेनेही आयुक्त मंगळे यांना घेरावा घातला. महागाई भत्ता, थकीत वेतन यासह कामगारांचे प्रश्‍न तातडीने सोडविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

LEAVE A REPLY

*