मलायकाचे फिटनेस अ‍ॅप येणार!

0

मलायका अरोरा आपल्या चाहत्यांना फिटनेसचे धडे देताना दिसणार आहे.

होय, स्वत:च्या फिटनेसची अनेक रहस्ये या अ‍ॅपद्वारे ती शेअर करणार आहे. खरे तर मलायका केवळ फॅशन आणि शॉपिंगबद्दलच बोलत असेल, असेच अनेकांना वाटेल. पण नाही, फॅशन व शॉपिंगपेक्षा मलायका स्वत:च्या फिटनेसबाबत क्रेझी आहे.

पौष्टिक आहार कसा घ्यायचा, फिट कसे राहायचे हे ती आपल्या चाहत्यांना सांगणार आहे. विशेष म्हणजे, या अ‍ॅपवर तुम्ही मलायकाला थेट प्रश्न विचारू शकणार आहात. तुमच्या फिटनेससंदर्भातील प्रश्नांना मलायका स्वत: उत्तरे देईल.

एका सूत्राने सांगितले की, वर्क आऊट आणि पौष्टिक आहार याबाबत ती कमालीची जागृत आहेत. मलायका स्वत: अजिबात डाएट करत नाही. ती सगळे खाते. अर्थात आपण काय खातोय आणि महत्त्वाचे म्हणजे किती खातोय, याकडे तिचे लक्ष असते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती डान्स, वेट ट्रेनिंग, योगा असे सगळे करते. यावर्षीच्या अखेरिस मलायकाचे हे फिटनेस अ‍ॅप लॉन्च होईल, अशी शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*