मराठा सार्वजनिक उन्नती मंडळातर्फे सामुदायीक विवाह सोहळा

0

नंदुरबार / मराठा समाज सार्वजनिक उन्नती मंडळातर्फे उद्या दि.7 मे रोजी सामुदायीक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.

इंदिरा सॉलवंटजवळील लिंबाई भवनमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सामुदायीक विवाह समारंभास सात जोडप्यांचे शुभमंगल लावण्यात येणार आहे.

सकाळी 11.35 वाजता विवाह मुहूर्त असून समाजातील सर्व बांधवांनी या विवाह सोहळयास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

विवाह स्थळी स्नेहभोजन देण्यात येणार आहे. या विवाह सोहळयात जोडप्यांनी आपले आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, एलसी. बँक पासबुक आणणे आवश्यक आहे.

बदलत्या काळात विवाह सोहळयावर होणारा खर्च कमी करण्याचा दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सर्व वधु- वरांनी सकाळी 7 वाजता विवाह स्थळी उपस्थित रहावे व समाज बांधवांनी स्वच्छेने मंडळाला देणगी देवून पावती घ्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*