मध्यावधीसही तयार

0

दिलीप वळसे ः कर्जमाफीची घोषणा फसवी

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- राजकीय पक्षांनी बारा महिने आणि चोवीस तास मध्यावधी निवडणुकांना तयार राहणे आवश्यक आहे. त्यानुसार राष्ट्रवादीदेखील मध्यावधीसाठी सज्ज आहे. जुलै महिन्यांत भूंकप होणार असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांना खर्‍याअर्थाने मध्यावधीबाबत विचारणा करणे आवश्यक आहे. सत्तेत असणार्‍या सेना-भाजपामध्ये सध्या कलगीतुरा सुरू असून भाजपने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी आहे.

 

मंत्रीमंडळाची मान्यता न घेता कर्जमाफीची केलेली घोषणा कायदेशीर कशी? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आमदार दिलीप वळसे यांनी नगरमध्ये उपस्थित केला आहे.

 

 

पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीनंतर वळसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ज्येष्ठ नेते मधूकर पिचड, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यावेळी उपस्थित होते.

 

 

वळसे म्हणाले, शिवसेना सत्तेत असतांना त्यांना ‘मध्यवधी’चे डोहाळे का लागले हे कळत नाही. बैठकीत वळसे यांनी राज्य सरकार अजून 3 लाख कोटींचे कर्ज काढून शेतकर्‍यांना कर्जमाफी देवू शकते, असे विधान केलेले होते. याबाबत विचारणा केली असता, आम्ही सत्तेत असतांना आताचे सत्ताधारी हा सल्ला आम्हाला देत होते. सरकारने एलबीटी माफ करतांना नियम अटी, शर्ती ठेवल्या का? मग शेतकर्‍यांना कर्ज माफी देतांना नियम अटी कशासाठी असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

 

 

संपर्णू कर्जमाफीसाठी राष्ट्रवादीचा प्रयत्न असून शेतकर्‍यांचा संप मोडून काढण्यासाठी भाजपाने पोलीस बळाचा वापर केला असल्याचा आरोप त्यांनी केला.

 

 

श्रीरामपूर, नेवाशाचे अधिकार अविनाश आदिक, चंद्रशेखर घुले, विठ्ठलराव लंघेंना
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवेळी भानुदास मुरकुटे यांंनी राष्ट्रावादीला वार्‍यावर सोडल्याने श्रीरामपूर तालुक्यात तर यशवंतराव गडाख यांनी राष्ट्रावादीतून बाहेर पडत क्रांतीकारी शेतकरी पक्षाचा झेंडा हाती घेतल्यानंतर नेवाशात राष्ट्रवादीची पिछेहाट झाली आहे. नेवासा आणि श्रीरामपुर तालुक्यात संघटनात्मक निवडीसाठी अविनाश आदिक, चंद्रशेखर घुले, विठ्ठलराव लंघे यांना अधिकार देण्यात आल्याचे वळसे यांनी सांगितले.

 

घुलेच जिल्हाध्यक्ष
राष्ट्रवादीच पक्षाची घटना असून त्यानूसार राष्ट्रीय अध्यक्ष ते तालुका अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी प्रक्रिया निश्‍चित केलेली आहे. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे नेते अजित पवार निर्णय घेतील. सध्या प्रदेशाध्यक्ष राज्याच्या दौर्‍यावर असून तेच याबाबत निर्णय घेतील. सध्या घुलेच जिल्हाध्यक्ष असल्याचे वळसे यांनी यावेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*