मक्का येथाील ग्रँड मशिदीवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

0

मक्का येथाील ग्रँड मशीद ही जगातील सर्वांत मोठी मशीद आहे.

रमजान महिन्यातील काल शेवटचा शुक्रवार होता. ईदची नमाज पठण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जगातील विविध भागातून मुसलमान मक्का येथे येतात.

मक्का मधील काबाच्या पवित्र मशिदीवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट सुरक्षा दलांनी उधळवून लावला.

सुरक्षा दलांनी मक्का मशिदीवर दहशतवादी हल्ल्याची योजना उधळवून लावल्याची माहिती शुक्रवारी सौदी अरेबियाच्या अंतर्गत मंत्र्यांनी दिली.

अल अरेबिया टीव्ही आणि सौदी सरकारची अधिकृत वाहिनी अल इखबारियाने हे वृत्त दिले.

संशयित आत्महघातकी हल्लेखोराने बॉम्बस्फोटाने स्वत:ला उडवून लावले. यात एका सैनिकासह ९ जण ठार झाले.

तीन दहशतवादी संघटनांनी एकत्रित येऊन हा कट रचल्याचे सौदी सरकारने सांगितले.

अजयाद येथील एका घरात आत्मघातकी हल्लेखोर लपले होते. त्यांनी शरण येण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर त्या दहशतवाद्याने स्वत:ला बॉम्बने उडवून दिले.

या घटनेत ६ नागरिक आणि ५ सैनिक जखमी झाले.

या प्रकरणी एका महिलेसहीत ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*