भोजडे साठवण तलाव भिंत दुरुस्तीचे काम निकृष्ट

0

ठेकेदारावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी

 

कोपरगाव (प्रतिनिधी) – कोळ नदीवरील भोजडे गावातील साठवण तलाव भिंतीचे दुरुस्ती आणि आस्तरीकरणाचे सध्या काम सुरू असून संपूर्ण कामात निष्काळजीपणा झाल्यामुळे संपूर्ण कामच निकृष्ट झाले असल्याचा पाढाच भोजडे ग्रामस्थांनी पंचायत समिती अधिकार्‍यांसमोर वाचला.

 
जिल्हा परिषदेच्या जलयुक्त शिवार अंतर्गत 6 लाख 44 हजार रुपये मंजुरी असलेले भोजडे साठवण तलाव भिंतीच्या कामाला संपूर्ण अस्तरीकरण करावयाचे होते. मात्र ते काम इस्टिमेटप्रमाणे झाले नसून त्यावर केलेल्या अस्तरीकरणावर पाणीच मारले नसल्याने ते सहजपणे तेथील ग्रामस्थ कैलास सिनगर, साहेबराव सिनगर यांनी पाहणी करण्यास आलेले पंचायत समितीचे उपअभियंता पि.के. मांढरे, शाखा अभियंता एस.ई. सातपुते यांना हाताने उखडून दाखवले. त्यामुळे त्यांनीही कामाच्या निकृष्ट दर्जाला दुजोरा देत वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्याचे अभिवचन देत ठेकेदाराचे बिल दिले जाणार नसल्याचे सांगितले.

 

कोळ नदीचे भोजडे शिवारात जलशिवार योजनेतून खोलीकरण रुंदीकरणाचे काम सुरू असून अतिवृष्टीने बंधार्‍यांची भिंत वाहून गेल्यास आजुबाजूची लोकवस्ती आणि लगतच्या गावांत जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काम सुरू असताना वरिष्ठांनी भेटी दरम्यान काम का थांबविले नाही याबाबत बंधारा परिसरातील नागरिकांत संभ्रम असून अशा ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची नागरिकांची मागणी आहे.

 

साठवण तलावाच्या भिंतीच्या कामाची स्वतः पाहणी करून कामाचा दर्जा निकृष्ट आढळून आल्यास जिल्हा परिषद प्रशासनाला ठेकेदारांवर कारवाई करण्यास लावणार.
– अनुसयाताई होन, सभापती

LEAVE A REPLY

*