भेंडा (वार्ताहर) – भारतातील साखर उद्योगात अग्रस्थानी असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) पुणे या संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांची निवड झाली आहे. महाराष्ट्राचे माजी मुखमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी 1975 साली या संस्थेची स्थापना केलेली आहे. केंद्रीय माजी कृषी मंत्री शरद पवार अध्यक्ष असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून सहकारी, खाजगी साखर उद्योग व ऊस उत्पादक शेतकरी यांना तंत्रज्ञान व संशोधनावर आधारित मार्गदर्शन केले जाते. नरेंद्र घुले पाटील यांनी सन 1992 पासून आजतागायत शासनाचे व सहकारी साखर कारखाण्याचे माध्यमातून जायकवाडी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचे सर्वांगीण प्रगतीचे दृष्टीने लोकोपयोगी कार्य केलेले आहे व करत आहेत. श्री मारुतराव घुले पाटील व जनता शिक्षण संस्थेच्या मार्फत परिसरातील शेतकर्‍यांचे मुला-मुलींच्या शिक्षणाची सुविधा निर्माण केली. ज्ञानेश्‍वर कारखान्याचे आधुनिकीकरण, सहवीज निर्मिती प्रकल्प विस्तारवाढ, आसवानी आधुनिकीकरण, तसेच नगर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांसाठी कृषी विद्यान केंद्राची स्थापना करून केंद्राचे माध्यमातून कृषी तंत्रज्ञान शेतकर्‍यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न श्री. घुले करीत आहेत. त्यांच्या निवडीचे ज्ञानेश्‍वर उद्योग समूहाचे संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांनी स्वागत केले आहे.

0

भेंडा (वार्ताहर) – भारतातील साखर उद्योगात अग्रस्थानी असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) पुणे या संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांची निवड झाली आहे.

 
महाराष्ट्राचे माजी मुखमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी 1975 साली या संस्थेची स्थापना केलेली आहे. केंद्रीय माजी कृषी मंत्री शरद पवार अध्यक्ष असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून सहकारी, खाजगी साखर उद्योग व ऊस उत्पादक शेतकरी यांना तंत्रज्ञान व संशोधनावर आधारित मार्गदर्शन केले जाते.

 

नरेंद्र घुले पाटील यांनी सन 1992 पासून आजतागायत शासनाचे व सहकारी साखर कारखाण्याचे माध्यमातून जायकवाडी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचे सर्वांगीण प्रगतीचे दृष्टीने लोकोपयोगी कार्य केलेले आहे व करत आहेत. श्री मारुतराव घुले पाटील व जनता शिक्षण संस्थेच्या मार्फत परिसरातील शेतकर्‍यांचे मुला-मुलींच्या शिक्षणाची सुविधा निर्माण केली. ज्ञानेश्‍वर कारखान्याचे आधुनिकीकरण, सहवीज निर्मिती प्रकल्प विस्तारवाढ, आसवानी आधुनिकीकरण, तसेच नगर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांसाठी कृषी विद्यान केंद्राची स्थापना करून केंद्राचे माध्यमातून कृषी तंत्रज्ञान शेतकर्‍यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न श्री. घुले करीत आहेत.

 

त्यांच्या निवडीचे ज्ञानेश्‍वर उद्योग समूहाचे संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांनी स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

*