भीमगीतांतून उलगडला काळाराम मंदिर सत्याग्रह

भूमिपुत्र अभिवादन समितीतर्फे आयोजन; मान्यवरांची उपस्थिती

0

नाशिक : भीमगीते आणि क्रांतीगीतांतून काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह आज उलगडण्यात आला. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन समितीच्या वतीने गंगाघाटावरील गौरी पटांगणावर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी माजी महापौर अशोक दिवे, विजय जाधव, रिपाइं नेते प्रकाश पगारे, मोहन अढांगळे, मुकुंद गांगुर्डे, रत्नाकर रुपवते, आनंद निरभवणे संजय साबळे, कैलास तेलोर, आदेश पगारे, नारायण गायकवाड, अविनाश अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. किशोर घाटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी लॉर्ड बुद्धा प्रस्तुत संतोष जोंधळे आणि ग्रुपने भीमगीतांचे सादरीकरण केले. या गीतांतून काळाराम मंदिराचा सत्याग्रह उलगडण्यात आला. एकापेक्षा एक सरस गीतांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमासठी धुळे शहर परिसरातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किशोर घाटे यांनी उपस्थितांचे स्वागत करत कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. बाबासाहेबांची ही चळवळ नवीन पिढीला माहिती झाली पाहिजे. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकर आणि दादासाहेब गायकवाड यांचा इतिहास समजावणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*