भिंगारच्या लष्करी हद्दीत घुसखोरी!

0

मराठवाड्यातील चौघे पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय लष्कारच्या भिंगार हद्दीत भटकणार्‍या चौघा तरुणांना गुरूवारी रात्री जवानांच्या मदतीने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर हेरगिरी केल्याचा संशय असून त्यातील एका तरुणाचे सोशल मिडियाच्या माध्यमातून थेट पाकिस्तानशी संबंध असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले तरूण उस्मनाबाद जिल्ह्यातील आहेत. या घटनेने भिंगारसह नगर शहरात खळबळ उडाली आहे.
दैलसा मक्सुम शेख, ख्वाजा मक्सुम शेख (रा. जेवळी, लोहरा. जि. उस्मानाबाद), शहनवाज इस्माईल कुरेशी (रा. नळदुर्ग. तुळजापुर), कारभारी इम्राण मुस्तफा (रा. सय्यद हिवर्गा, जि. उस्मानाबाद) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत. गुरुवारी (दि.10) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आर्मीच्या फायरिंग क्षेत्रात काही तरूण संशयीतरित्या फिरत असल्याचे जवानांना दिसले. जवानांनी तरूणांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. या भागात प्रवेश नसताना तुम्ही इकडे कसे आलात अशी विचारणा त्यांच्याकडे करण्यात आली. नोकरीनिमित्त नगरला आलो असून भिंगारमध्ये राहतो. धार्मिक विधी आटपून परतत असताना दिशाभूर झाल्याने इकडे पोहचलो असे उत्तर या तरुणांनी दिले. त्यांची नावे ऐकून जवानांनी त्यांच्याकडील मोबाईल काढून घेतले. चार ते पाच तास जवनांनी या तरुणांकडे चौकशी केली. त्यातील एका तरूणाच्या मोबाईलमध्ये एक संशयीत व्हॉटसअ‍ॅप गृप मिळून आला. त्यामुळे या तरुणांना भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

व्हाट्अ‍ॅपवर पाकिस्तानी गु्रप
अटक केलेल्या एका आरोपीच्या मोबाईलवर एक गृप पाकिस्तानचा असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र तो धार्मिक नावाने असल्यामुळे या गृपला सामिल व्हा असा संदेश आल्यामुळे ही लिंग या तरुणाने लाईक केली होती. अर्थात या गृपमध्ये संशयीत असे कोणतेही संदेश मिळून आले नाही.

अफवांचे पेव
भिंगारच्या लष्करी भागात संशयीत आतंकवादी असल्याची अफवा भिंगार परिसरात पसरली. त्यामुळे भिंगार परिसरात एकच खळबळ उडाली. रात्री सहायक पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे यांच्यासह अन्य अधिकारी भिंगार पोलीस ठाण्यात दाखल झाले. या माहितीची गुप्तता पाळून सर्वांची सखोल चौकशी करण्यात आली. पोलिसांची खात्री पटल्यानंतर सुटकेचा निश्‍वास टाकण्यात आला.

उपजिविकेसाठी काही तरूण भिंगार परिसरात राहतात. प्रत्येक जातीधर्माचे 15 पेक्षा जास्त तरुण एकोप्याने राहत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी प्रत्येकाचे जबाब नोंदविले असून त्यांच्या जबाबात विसंगतीने आली नाही. त्यांच्याविरुध्द संगनमताने आर्मी फायरिंग क्षेत्रात अनाधिकाराने प्रवेश केल्याचा गुन्हा भिंगार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कैलास देशमाने करीत आहेत.

LEAVE A REPLY

*